A list of sites on the state of maharashtra agriculture ( महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी )

आधुनिक कृषितंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करणारी एकच यंत्रणा असावी यादृष्टिने कृषि विभागाची रचना करण्यांत आलेली आहे. सुलभ संपर्कासाठी प्रत्येकी तीन ते चार खेडयांसाठी एक कृषि सहायकाचे पद देण्यांत आलेले आहे. या कृषि सहायकाचे कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकरी कुटुंबाची सरासरी संख्या ८०० ते ९०० पर्यत असल्यामुळे कृषि तंत्रज्ञान थेट शेतक-यांपर्यत पोचविणे सुलभ झाले आहे.


विषयक सर्व योजना राबवल्या जातात. यावर मंडलस्तरावर मंडल कृषि अधिकारी यांचे नियंत्रण असते. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषि अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व संभागस्तरावर विभागीय कृषि सह संचालक यांची कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेकडे कृषि विकास अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय नियंत्रणाखाली पंचायत समितीस्तरावर कृषि अधिकारी हे निरनिराळया कृषि निविष्ठाविषयक योजना राबवतात.

क्षेत्रीय स्तरावर राबवल्या जाणा-या सर्व योजनांच्या तांत्रिक व प्रशासकीय संनियंत्रणासाठी राज्यस्तरावर कृषि आयुक्तालयात मृदसंधारण, फलोत्पादन, विस्तार, निविष्ठा व गुणनियंत्रण , सांख्यिकी, संनियंत्रण व मुल्यमापन, नियोजन व अंदाज हे विभाग कार्यरत आहेत, तर आस्थापना व लेखाविषयक बाबींची हाताळणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत.

Agricultural Education and Research Institute(कृषी शिक्षण व संशोधन संस्था )

१. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
५. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

ऑनलाईन बाजार भाव:

१. कृषी पणन मंडळ
२. आजचा बाजारभाव
३. शेती माल माहिती
४. शेती देवाणघेवाण 

कृषी आकडेवारी:

१. कृषी गणना
२. पर्जन्यमान
३. पिक पेरणी
४. पिक सांख्यिकी

महत्त्वपूर्ण कृषी व्यावसायिक संस्था आणि योजना:

११. महाराष्ट्र शासन
१२. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
१३. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर
१४. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती
१५. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, महाराष्ट्र राज्य
१६. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
१७. छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ
१८. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित

जर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.

!!जय महाराष्ट्र!!

SHARE THIS

0 टिप्पणी(ण्या):