पाण्याचा दुख:काळ का पडतो? (How to shortage for water?)
पाण्याचा दुख:काळ का पडतो? ह्या प्रश्नावर मी गेली कित्येक दिवस विचार करीत आहे. आणि त्यातून मला समजलेली काही कारणे. निश्चितच इथे मी जी नमूद केली आहेत त्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकतात.
गैरवापर:
- बेहिशोबी आणि बेजबाबदार पिक व्यवस्थापन
- नदी पात्रांमधील, ओढे-नाल्यावरील अतिक्रमण
- बेसुमार वाळू उपसा आणि तस्करी.
- अवैध जंगलतोड
- वाढते प्रदूषण
- बंधारे आणि जलाशयांचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर
- जमिनीखालील पाण्याचा बेसुमार उपसा
नियोजनाचा अभाव:
- पावसाच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि संधारणाविषयीची उदासीनता
- शेतामधील नष्ट होणारे बांध आणि त्यामुळे नाश पावणारी वनराई
- सुमार वृक्ष लागवड व संवर्धनाच्या नावाने असणारी बोम्ब
- अनियमित आणि अनिर्बंध शहरीकरण
- वाढत्या कुपनलिका/ट्यूबवेल/बोअरवेल
दुर्लक्ष:
- पाण्याच्या वाहतुकीमध्ये होणारी गळती
- दुषित पाणी, मल विना प्रक्रिया नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडणे
- मोठाले धरणं बांधून पाण्याच्या जाणीवपूर्वक वापराकडे होत असलेले दुर्लक्ष
- सूक्ष्म आणि मध्यम जलाशयांकडे होत असलेले अघोरी दुर्लक्ष
- जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष
परंतु अजून खोल विचार केल्यावर लक्षात आले कि हि तर फक्त लक्षणं आहेत खरे कारण तर “नेत्तृत्त्वाचा अभाव आणि स्वधर्माचा पडलेला विसर” आहे.
!!जय महाराष्ट्र!!
0 टिप्पणी(ण्या):