Functions of Gram Panchayat in Maharashtra (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचे कार्ये)

Functions of Gram Panchayat in Maharashtra (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कार्ये)

ग्रामपंचायत म्हणजे एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा. ग्रामपंचायत कामकाजाचे ८ विभाग व २३ विषय खालीलप्रमाणे असतात...

ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :

  1. भूविकास
  2. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
  3. जमिनीचे एकत्रीकरण
  4. मृदुसंधारण
  5. लघु पाट बंधारे
  6. सामाजिक वनीकरण
  7. घर बांधणी
  8. खादी ग्रामोद्योग
  9. कुटिरोद्योग
  10. रस्ते, नाले, पूल
  11. पिण्याचे पाणी
  12. दळण वळणाची इतर साधने
  13. ग्रामीण विद्युतीकरण
  14. अपारंपरिक उर्जा साधने
  15. दारिद्रय निर्मुलन
  16. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
  17. बाजार आणि जत्रा
  18. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
  19. महिला आणि बालविकास
  20. प्रौढ शिक्षण
  21. सांस्कृतिक कार्यक्रम
  22. सार्वजनिक वितरण
  23. उत्पादनाच्या बाबी

ग्रामपंचायतींची कार्ये:

  1. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
  2. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
  3. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
  4. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
  5. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
  6. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
  7. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
  8. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे

!!जय महाराष्ट्र!!

SHARE THIS

0 टिप्पणी(ण्या):