अशी करा जमिनीची मोजणी - Do this so calculate the land

"गुगल मॅप' या संकेतस्थळाचा वापर करून आपल्याला शेताचे अथवा प्लॉटचे क्षेत्रफळ मोजता येणे शक्‍य आहे. यात जमिनीचे क्षेत्रफळ वर्ग मीटर अथवा एकरमध्ये मिळते. याद्वारे कमीत कमी २५० चौ.फूट क्षेत्रफळ अचूक मोजता येते. गुगल मॅप हे संकेतस्थळ सर्वांना परिचित आहे. यामध्ये दिसणारी गावे, रस्ते, नदी, नाले व ओळखीचा परिसर अनेकांनी बघितला असेल. संकेतस्थळाद्वारे कमी वेळेत शेताचे अथवा प्लॉटचे क्षेत्रफळ मोजता येते, त्यामुळे हे संकेतस्थळ जमीन मोजणीसाठी अतिशय फायदेशीर आहे.

अशी करा जमिनीची मोजणी - Do this so calculate the land

अशी करा जमिनीची मोजणी - Do this so calculate the land

GPS Area Measurement Calculator
  • www.google.com वर "गुगल मॅप एरिया कॅल्क्‍युलेटर टूल' असे ऑपरेट करावे. 
  • त्यात क्विक फाइंड अशी चौकट दिसेल, त्यात आपल्या देशाचे व शहर/गावाचे नाव टाकावे. 
  • शेजारी मॅप अशी एक चौकट दिसते. त्यावर क्‍लिक करून सॅटेलाइट ऑप्शन सिलेक्‍ट करावे. 
  • डाव्या हाताला असलेल्या बारवरून इमेज जवळ नेऊन आपल्या जमिनीचे क्षेत्र शोधावे. 
  • त्यावर छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे जमिनीच्या क्षेत्राच्या मध्यभागी क्‍लिक करावे. 
  • त्यानंतर जितके क्षेत्र असेल त्याच्या चारही टोकांना अशाप्रकारे क्‍लिक करताच हिरव्या रंगाने हे क्षेत्र झाकले जाईल. 
  • त्याच्याबरोबर खालील बाजूस आऊटपूट अशी चौकट असते, त्यात आपल्या जमिनीच्या क्षेत्रफळाचे मोजमाप दिलेले असेल.
जमीन खरेदी करण्यापूर्वी जागेचे नक्की क्षेत्र मोजता येणे आवश्‍यक असते. सरकारी मोजणी ही कायद्याच्या दृष्टीने अंतिम मानली जाते. प्रत्यक्ष मोजणीसाठी लागणारा वेळ व त्या ठिकाणी वेळ देऊन उपस्थित राहणे हे पाहता खात्री करून घेण्यासाठी हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त आहे. लागवडीखालील क्षेत्र मोजणे, किती जमीन लागवडीखाली व किती पडीक आहे यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे; तसेच कोकणात आंबा लागवडीच्या बाबतीत विशेष उपयुक्त आहे.

शेतकऱ्यांना व विशेषतः मोठे क्षेत्र असणाऱ्या व्यक्तींना "गुगल'द्वारे स्वतःच्या जमिनीच्या क्षेत्रफळाचा अंदाज बांधण्यासाठी याचा निश्‍चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो. वादांची संख्या मर्यादित राहावी म्हणून शेतकऱ्यांना एकत्रितरीत्या बसून समोर गुगलचा मॅप पाहून नक्की कोठे फरक पडतो याचा अंदाज बांधता येईल. प्रत्येक वेळी महागडी मोजणी करून घेण्याची आवश्‍यकता राहणार नाही. तंटामुक्त मोहिमेमध्ये ज्या गावांनी समूहाने काम केले आहे, अशा गावांना एकत्रितरीत्या विचार करून बांधांचे वाद मिटविण्यासाठी चांगला उपयोग होईल.

SHARE THIS

0 टिप्पणी(ण्या):