खाजगी जागेवरील अतिक्रमणे काढणे - Removal of encroachment on private land.

शेती असो किंवा प्लॉट ग्रामीण असो व शहरी अशा दोन्ही भागात अतिक्रमण हा संवेदनशील मुद्दा आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमणाचा तसा वैयक्तिक जीवनावर होणारा परिणाम प्रत्येक्ष आर्थिक हानीशी जास्त निगडित नसतो. परंतु खाजगी किंवा वैयक्तिक जागेवर होणारे अतिक्रमण प्रत्येक्ष व्यक्तीच्या आर्थिक बाबीवरच गदा आणणारे असते. त्यामुळे खाजगी जागेवर होणारे अतिक्रमण कसे काढावे व त्यासाठी काय करावे? या बाबींची माहिती असणे आवश्यक आहे.

Removal of encroachment on private land

खाजगी जागेवरील अतिक्रमणाचे क्षेत्रे :-

  1. शेतीमधील अतिक्रमणे ज्यात बांध कोरणे , शेतीवर ताबा इ.
  2. दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीच्या काही भागात बांधकामाचा भाग जाणे. किंवा संपूर्ण घरच दुसऱ्यच्या जागेवर बांधणे.
  3. सांडपाणी, पाण्याचा हौद, पायऱ्या, जिना, अशा बाबाजी इतरांच्या जागेवरून घेणे.
  4. आम्हीच जमीन इतकी आहे. असा दावा करून दुसऱ्या व्यक्तीची जमीन आपल्या ताब्यात घेणे.
  5. सार्वजनिक प्रयोजनाचे कारण दाखविणे उदा. व्यायाम करणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे असे वारंवार किंवा रोज करून सदर जागेवर दावा सांगणे.
  6. धार्मिक कामासाठी किंवा प्रयोजनाचे कारण पुढे करून इतरांच्या क्षेत्रावर अतिक्रमण करणे.

खाजगी मालकीच्या जागेवर अतिक्रमणे का होतात?

  1. व्यक्ती शहरात नोकरीला आहे. किंवा त्या जमिनीचे मालक येथे नाहीत म्हणून तेथे अतिक्रमण केले जाते.
  2. जागेचे भाव प्रचंड असल्याने हेतू पुरस्कार काही व्यक्ती अतिक्रमण करून वाद करतात व ते वाद मिटविण्यासाठी पैसे घेणे किंवा जमिनीचा काही भाग घेतात.
  3. त्यांना वारस नाही. किंवा त्यांच्या घरात पुरुष नाही कर्ता पुरुष मयत आहे. अशा कुटुंबाच्या बाबत त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत जागेवर अतिक्रमण केले जाते.
  4. प्लॉटला कंपाउंड नसणे किंवा शेत जमीनीला बांधाच्या खुणा नसणे हि परिस्थिती अतिक्रमणास कारणीभूत ठरते. माहिती प्रवाह.
  5. बांधकामाच्या वेळी शेजारील प्लॉट धारक येऊन गोंधळ घालतात. आमची जागा इतकी आहे. असे वाद घालतात. प्रत्येक्ष बांधकाम चालू असल्याने व्यक्ती नमती भूमिका घेतात व अतिक्रमण होते.

अतिक्रमण झालेल्या भूखंड किंवा जागेवरील खाजगी मालकीच्या जमीन धारकांची आजची स्थिती :-

अनेक वेळा अतिक्रमण झालेल्या जागेचा हा अतिक्रमण कसे काढले जाते? त्यासाठी काय करावे लागते? याबाबत पाहिजे त्या प्रमाणात माहिती नसते. त्यामुळे असे अतिक्रमणांचा कालावधी वाढतच जातो. त्यातून संबंधित अतिक्रमणाचा मुद्दा अधिकच किचकट बनतो. यातून शब्गिक वादाचे रूपांतर हे कालांतराने भांडणे हाणामारी यापर्यंत येते. सर्व प्रथम कोणताही खाजगी मालक हा त्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत नम्रपणे आणि समजुतीच्या भूमिकेतून अतिक्रमण धारकाला समजून सांगतो परंतु काही प्रसंगी हि भूमिका फोल ठरते.

मालकी जमिनीवरील अतिक्रमण संबंधी महत्वाच्या बाबी :-

  1. खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी हि प्रत्यक्ष त्या जमिनीच्या मालकीचीच असते.
  2. बरेच वेळा खाजगी मालकीच्या जमीनीच्या अतिक्रमणाबाबतची कैफियत हि तहसीलदारांकडे मांडली जाते. खाजगी मालकी जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढावे किंवा त्याबाबत केस तहसीलदार यांचेकडे चालविली जात नाही व त्यासंबंधी कोणताही आदेश ते देत नाहीत. आपणास माहिती नसल्याने आपला असा ग्रह होतो कि, तहसीलदार हे न्याय देत नाहीत. उपरोक्त बाबीचा विचार करता खाजगी मालकीची अतिक्रमांबाबतचा विषय तहसीलदार यांच्या अधिकारात येत नाही.
  3. बरेच वेळा गावी जागा असते आणि व्यक्ती नोकरीसाठी किंवा अन्य कारणाने शहरात जातो. नंतर १५ ते २० वर्षाने त्याला आपल्या जागेवर इतर लोकांचे अतिक्रमण दिसते अशा प्रसंगी तो ग्रामपंचायत, तहसील, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी दाद मागतो. परंतु बरेच वेळा असे अतिक्रमणे काढली जात नाही. यातून तो व्यक्ती वरील सर्वच कार्यालयाच्या बाबत गैरसमज करतो कि, यासर्वांनी आपल्यावर अन्याय केला आहे. परंतु या ठिकाणी हे समजून घेतले पाहिजे कि, जर एखाद्या जागेवर १५ वर्षा पेक्षा जास्तीचे अतिक्रमण आहे. आणि संबंधित जागेच्या मालकाने एकदाही त्यासंबंधी तक्रार केली नसेल तर अतिक्रमण करणारी व्यक्तीचा वाहवाटीचा हक्क लागण्यासाठी सदर परिस्थतीती पोषक ठरते. जागेचे वाढलेले भाव त्यातून आपली जागा अतिक्रमणात गेली आहे. यासाठी काही तरी केले पाहिजे अशी भावना बळावते.
  4. म्हणून खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमण झाल्यास लवकरात लवकर तक्रार करणे अपेक्षित असते. अशी तक्रार पोलीस स्टेशन प्रसंगी कोर्टातून दावा दाखल करून केली पाहिजे.
  5. गळ्यातील व्यावसायिक, घरभाडेकरू या बाबत असलेल्या व्यक्ती हे अतिक्रमण होत नाही. त्यासाठी भाडेकरू कायद्यान्वये तरतुदी आहेत. अतिक्रमण या विषयात मुख्यतो कोणताही करार न करता इच्छे विरुद्ध भूभागावर ताबा सांगणे व तो करणे या बाबीचा समावेश होतो.
  6. वरील पाचही घटकांचा विचार करता खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमांबाबत व जमिनीच्या संरक्षाबाबतचे दायित्व हे पूर्णपणे जमीन मालकीचेच असते. हे लक्षात घेतले पाहिजे.

खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमण व पोलीस स्टेशन :-

खाजगी मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाले जागा मालकाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आपली कैफियत मांडली. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली आता पोलीस येतील आणि लगेच अतिक्रमण काढले जाईल. अतिक्रमणधारकाला तुरुंगात टाकले जाईल. असे होत नाही. कारण सदर बाब हि दिवाणी स्वरूपाची आहे. त्याच प्रमाणे अतिक्रमण खरंच झाले आहे का ?

या संबंधी नकाशे पाहून न्यायनिवाडा करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. त्यामुळे बरेच वेळा आम्ही तक्रार केली तरी पोलीस काही करत नाही. असा निष्कर्ष मांडला जातो. परंतु सदर बाब व त्यातील अडचणी मर्यादा लक्षात घ्याव्यात पोलिसांना अधिकार नाही म्हणून पोलिसात सदर बाबींचा तक्रार का द्यावी ?

खाजगी मालकीच्या जागेवरील अतिक्रमण कसे काढाल :-

खाजगी मालकीची जागा हि शेत जमीन असो किंवा प्लॉट असो याबाबत झालेले अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया तसे पाहता बहुतांशी प्रदीर्घ काळाची आहे. अतिक्रमण दूर करण्यासाठी केलेल्या दिवाणी प्रकरणात अपील करण्याच्या कार्यपद्धतीतून हा अतिक्रमणधारकाचा जागेवरील ताबा असण्याचा कालावधी वाढलेला दिसून येतो. हे हि येथे ध्यानात घेतले पाहिजे. अशी अपिले हि सामान्यतः ज्या ठिकाणी जागेचे भाव जास्त आहे. तेथे उदा. शहरीभागातील जमिनीवरील अतिक्रमणाबाबत जास्त असतात.

अशी अतिक्रमणे काढण्यासाठी सामान्यतः खालील पद्धती वापरावी :-

  1. आपल्या मालकी हक्काच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे असे लक्षात आल्यावर लगेचच तसा आक्षेप नोंदविणे महत्वाचे आहे. काही प्रकरणांमध्ये इतके दुर्लक्ष केले जाते कि, गाडगी १५ वर्ष होऊन नंतर अतिक्रमण झाल्याची तक्रार दिली जाते. त्यामुळे अशा प्रकरणांत न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी होते.
  2. आक्षेप नोंदविताना तो उचित ठिकाणी नोंदवावा. खाजगी मालकीच्या जमीनीबाबत तहसीलदार यांचेकडे बरेच लोक अर्ज करतात परंतु तसे न करता पोलीस स्टेशनमध्ये अतिक्रमण झाले बाबत तक्रार दाखल करणे अपेक्षित असते.
  3. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेतली जात असेल किंवा द्यायची नसेल तर दिवाणी दावा दाखल करावा त्यासाठी वकिलांकडे जाणे उचित ठरेल.
  4. उपरोक्त तक्रार देते वेळी ती लेखी असावी व त्या तक्रारीचा संबंधीत विभागातील नोंदणी क्रमांक तक्रार अर्जाची दुय्यम प्रत आपले जवळ ठेवणे भविष्यात फायद्याचे ठरते.

प्राधान्य न्याय निवाडा करण्याची प्रक्रिया:-

तुम्ही आमचे जागेवर दोन फूट अतिक्रमण केले आहे. किंवा तुम्ही आमचा भूभाग बळकावला आहे. इ. बाबत जेंव्हा वाद उपस्थित राहतो तेंव्हा अशा प्रकरणात भूमिअभिलेख विभागाचे काम हे अत्यंत महत्वाचे व न्याय देण्यासाठी पूरक ठरते.

तालुका भूमिअभिलेख कार्यालय :-

प्रत्येक तालुक्यात हे कार्यालय असून या कार्यक्रमात संपूर्ण तालुक्यातील जमीनीच्या हद्दी सह नकाशे असतात. त्याच प्रमाणे जमीन मोजणी प्रक्रिया याच कार्यलयातून केली जाते. मोजणी प्रक्रिया कशी होते? यासाठी वाचा माहिती प्रवाहाचे मोजणी पुस्तक .

दोन जमीन धारकांमध्ये जेंव्हा क्षेत्रावरून वाद निर्माण होतो. किंवा एकाने अतिक्रमण केले आहे असा दावा केला जातो तेंव्हा अशा प्रकरणात प्रथम वादग्रस्त जागेची मोजणी करून घ्यावी हि मोजणी सरकारी असावी. म्हणजेच भूमिअभिलेख यांच्या कार्यालयामार्फत सदर मोजणी केली जाते.

मोजणी नंतर भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने मोजणी भागाचा नकाशा देण्यात या नकाशात अतिक्रमण झालेले क्षेत्रासह संपूर्ण भागाचे क्षेत्र त्याचे क्षेत्रफळ आदी बाबी दर्शविलेल्या असतात यात.
  1. वहिवाटीची हद्द हि - - - अशा तुटक तुटक रेषेने दर्शविलेली असते तर.
  2. प्रत्यक्ष रेकॉर्ड प्रमाणे येणारी हद्द हि ---------- प्रमाणे सलग रेषेने असते. या दोन्ही रेषांचा अतिक्रमण क्षेत्र दर्शवण्यासाठी वापरण्यात येतात.
उपरोक्त दोन्ही रेषेमधील अंतर हे अतिक्रमण दर्शवते. असे अतिक्रमण झालेले क्षेत्र रंगाने रंगवून दर्शविलेले असते. असे क्षेत्र ज्या व्यक्तीच्या कब्जामध्ये असते त्या गट नंबर मधील गटनंबरच्या मालकीने अतिक्रमण केले आहे असा उल्लेख केलेला असतो.

वरील नकाशा वरून अतिक्रमणधारकाला त्याची चूक दर्शवण्यात येते. असे बरेच वेळा अतिक्रमणधारक हा आपली चूक मेनी करत नाही. त्यासाठी तो खालील मार्ग स्वीकारतो.
  1. मोजणीच्या दिवशी उपस्थित न राहणे.
  2. मोजणी माझे समोर झालीच नाही असा वाद उपस्थित करतो
  3. मोजणी कामात गोंधळ झाला आहे.
  4. मोजणी करणार हा भ्रष्टचारी आहे. आदी मुद्दे मांडले जातात.
  5. मोजणी चुकीची झालेली आहे.
परंतु याठिकाणी हे लक्षात घ्यावे कि, अतिक्रमणधारकाच्या अशा मुद्द्याला कोणताही आधार नसतो. हि बाब अगदी तहसील, भूमी अभिलेख अधिकारी, कोर्ट या सर्वांना माहिती असते. म्हणून हे दवे फोल ठरतात.

कलम १३८ अन्वये बी.एन.डी केस :-

जर येथे वाद हा शेतीच्या बांधावरून असेल तर अशा प्रकरणात दुबार मोजणी झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३८ नुसार बी.एन.डी. केस करावी अशी केस उपविभागीय दंडाधिकारी/ प्रांताधिकारी यांचेकडे करावी. त्यासाठी त्यांच्या कडे रीतसर अर्ज करून अतिक्रमण झालेल्या जागेची रीतसर मागणी करावी. अर्जासोबत प्रथम मोजणी नकाशा, दुबार मोजणी नकाशा जोडावा.

या प्रकरणात मा. प्रांताधिकारी हे संबंधित दोन्ही पक्षकारांना बोलावतात. दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देतात. त्याच प्रमाणे अतिक्रमण बाबत विविध साक्ष, पुरावे तपासले जातात. व त्यानुसार न्याय निवाडा करतात. काही प्रसंगी असं न्याय देवूनही अतिक्रमण करणारी व्यक्ती जमीनीचा ताबा सोडत नाही म्हणून यासाठी कोर्टात दावा दाखल करावा लागतो.

या ठिकाणी हे लक्ष घेतले पाहिजे कि, जमिनीची किंमत व महत्व नुसार अतिक्रमण करणारा व्यक्ती ताबा निश्चित करत असतो. म्हणजेच अतिक्रमण करणारा सदर जागा अतिक्रमित ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो.

कोर्ट कमिशन मोजणी :-

१. कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?
मा. दिवाणी न्यायालयाकडील आदेश, तीन महातील अधिकार- अभिलेख (७/१२) ,मोजणी फी भरल्याचे चलन, वादी-प्रतिवादींची नावे/ पत्ते चालु परिस्थिती प्रमाणे मोजणी करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सिमा इत्यादी कागदपत्रे प्रकरणी आवश्यक असतात.
२. कोर्ट कमिशन मोजणी कधी करता येते ?
जमिनीचे हद्दीमध्ये धारकामध्ये वाद निर्माण झाल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करुन वादी - प्रतिवादी यांच्या बाजू/ म्हणणे ऐकुण निप:क्षपाती निर्णय होणेसाठी या विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची कोर्ट कमिशनर नेमणुक होऊन मोजणीसाठी पाठविले जाते.
३. कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात मोजणी फी आकारणी कशी केली जाते ?
कोर्ट कमिशन प्रकरण न्यायालयाकडून प्राप्त झालेवर अभिलेखाप्रमाणे तातडीच्या दराने मोजणी फी आकारावी

SHARE THIS

१९ टिप्पण्या:

  1. दिवाणी दावा दाखल केल्यानंतर अतिक्रमण किती दिवसांनी काढता येते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. दिवाणी दावा दाखल झाल्यावर अतिक्रमण किती दिवसात निघते

      हटवा
    2. दिवाणी दावा दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते बरेचदा प्रतिवादी वेळकाढूपणा करून कोर्टाचा वेळ घेतो आणि यामध्ये बराच वेळ सांगते म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये हे मुद्दा बरोबर स्टेप डिप्रेशन दाखल करावे जेणेकरून मूळ जागा चा निकाल लागेपर्यंत हे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीस त्या ठिकाणी बांधकाम करता येणार नाही

      हटवा
  2. कोर्टात दावा केल्यानंतर निकाल लागण्यासाठी किती वेळ लागतो

    उत्तर द्याहटवा
  3. आमच्या जागेवर ग्रामपंचायत तिह्राईत व्यक्ती च्या नावे सरकारी घरकुल योजना मंजूर करून दिली माझ्याकडे गाव नमुना आठ उतारा आजोबांच्या नावे आहे . ग्रामपंचायत अर्ज केले आहे.कोणतीहो कार्यवाही केली नाही.कृपया मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. त्याबाबत आपण प्रथम माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सदर घरकुल लाभार्थी यास मंजूर झालेल्या घरकुलाचे अधिकृत मंजुरी पत्र घ्यावे व सदर धडकून कुठल्या जागेत बांधण्यासाठी मंजूर झालेले आहे आहे ते पाहून घ्यावं त्यानंतर सदर माहिती अभ्यास होऊन माननीय गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार अर्ज करू सदर घरकुल बांधकाम हे बेकायदेशीर होत असल्याबाबत अवगत करावे जेणेकरून सदर घरकुल लाभार्थी यादी सदर योजनेचा लाभ मिळणार नाही याउपरही ही आपणास न्याय न मिळाल्यास आपण सदर तक्रार अर्जाची अर्जाची प्रत वकिलामार्फत कोर्टात दाखल करू शकता सुरुवातीस आपणास सदर प्रकरणांमध्ये स्टे ऑर्डर द्यावी लागेल त्यानंतर मूळ अर्जावर निकाल

      हटवा
    2. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.साहेब
      मी पंचायत समिती व जिल्हाधिकारी कायॆलयात अज॔ केले आहे.कोणतीही दखल घेतली नाही.

      हटवा
  4. आम्हाला बेघर योजनेअंतर्गत १ गुंठा जागा मिळाल्या होत्या, परंतु आमच्या जागेत एकाने घर बांधले आहे ८ वर्ष झाली असून तो सध्या आम्हाला दमदाटी करतो भांडणे करतो, ग्रामपंचायत आणि अधिकारी दखल घेत नाही ,काय करावे

    उत्तर द्याहटवा
  5. आम्हाला बेघर योजनेअंतर्गत १ गुंठा जागा मिळाल्या होत्या, परंतु आमच्या जागेत एकाने घर बांधले आहे ८ वर्ष झाली असून तो सध्या आम्हाला दमदाटी करतो भांडणे करतो, ग्रामपंचायत आणि अधिकारी दखल घेत नाही ,काय करावे

    उत्तर द्याहटवा
  6. दिवाणी दावा दाखल केल्यापासून अतिक्रमण किती दिवसात काढून मिळेल

    उत्तर द्याहटवा
  7. दिवाणी दावा दाखल केल्यापासून अतिक्रमण काढून मिळण्याचा जास्तीत जास्त कालावधी किती असेल

    उत्तर द्याहटवा
  8. प्रत्युत्तरे
    1. दिवाणी दावा दाखल केल्यापासून अतिक्रमण काढून मिळण्याचा कालावधी किती असेल
      Sir i riqwest you pliz help mi my mob. No 9975010204

      हटवा
  9. दिवाणी दावा दाखल केल्यानंतर अतिक्रमणं हे कीती दिवसात निघेल असे काही बंधन आहे का कारण न्याय व्यवस्था फार थंडी पडली आहे

    उत्तर द्याहटवा
  10. कोर्ट कमिशन मोजणी 2015ला केली आहे अजून काही मेळ नाही न्याय व्यवस्था फार थंडी आहे कठोर पावले उचलून ताबडतोब निर्णय घेण्याची गरज आहे तुमचा मो. पाठवा. उत्तम काशिनाथ कुटे (वंजारी) माझं मो 9657369588

    उत्तर द्याहटवा
  11. मी आदिवासी आहे.माझ्या जमिनीवर बिगर आदिवासीनी दादागिरी करून घर बांधले आहे.मी त्याच वेळेस कॉर्टात दावा दाखल केला आहे.घर काढता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  12. गावात गट नंबर.७ मध्ये आमचे वडीलांच्या नावे ३ गुंठे क्षेत्र आहे ,त्या क्षेत्रावर भावकीतील चुलत चुलते पावसाळ्यात पेंडी कापत होते, काही वेळा तेथे पावसाळ्यात नाचना, रताली ही पिके घेत होती, आम्हि आमचीच माणसे आहेत करु देत म्हनुन काही विरोध केला नव्हता पण आता आम्हाला घर बांधनेसाठी जागा हवी आहे पण चुलत चुलते दादागिरी करतात , जागा देईनात.वकील दिवाणी दावा करणेबाबत सांगतात.दिवाणी दावे खर्चिक आणि वेळखाऊ असतात.जागा मिळविण्यासाठी दुसरा पर्याय काय आहे का?

    उत्तर द्याहटवा