How to Apply SEBC Maratha Caste Certificate? - SEBC मराठा जात प्रमाणपत्र कसे काढावे?

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) नागरिकांच्या वर्गांच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधीत किंवा तदनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनियम पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.


मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मराठा जात प्रमाणपत्र काढावे लागेल. त्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करा.

पायरी : १) जातीचा पुरावा काढणे

तुमचा जातीचा पुरावा काढा -

  • सर्वप्रथम तुमच्या नावापुढे "मराठा" असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा. पुर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत (True Copy) घ्या.
  • जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा. परंतु बोनाफाइडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा, याची काळजी घ्या.

१३ ऑक्टोबर १९६७ चा जातीचा पुरावा काढा -

तुमच्या वडिलांचा जन्म १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा मिळवा.

अ)पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.
ब)जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क)शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड)समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.

काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर,

तुमच्या घरात १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या, आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याच्यी "मराठा" अशी जात नमुद असणारा खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.

अ)पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.
ब)जन्म-मृत्यु नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
क)शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
ड)समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र

अशा प्रकारे "मराठा" जातीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.

  1.  तुमचा जातीचा दाखला
  2.  १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीचा मराठा जातीचा पुरावा.
या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
=======================

पायरी २) रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे.

  1. रेशनकार्ड
  2. आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा. आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहीवासी दाखला घ्या.
                                                                  किंवा
  1. लाईट बिल किंवा कर आकारणी पावती
  2. मतदान ओळखपत्र/पैन कार्ड/ड्राइविंग लाइसेंस/कॉलेज ओळ्खपत्र/आधारकार्ड
अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.
  1. रेशनकार्ड
  2. रहिवासी दाखला किंवा लाईट बिल
  3. कोणतेही एक ओळखपत्र
या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
=======================

पायरी ३) तहसीलदार कार्यालयातुन जातीचा दाखला काढणे.

  1. तुमच्या जातीचे, रहिवासी व ओळखीचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.
  2. तेथुन जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या.
  3. अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा. 
  4. अर्जावर १०रु. किंमतीची तिकीटे/कोर्ट फी स्टँप लावा.
  5. पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा -

  1. पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
  2. रेशनकार्डची सत्यप्रत
  3. रहिवासी दाखला
  4. तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
  5. १३ ऑक्टोबर १९६७ च्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
  6. साध्या कोऱ्या कागदावर जातीबाबत व वंशावळीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर ५ रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ)अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब)अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.

प्रतिज्ञापत्राचा नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पायरी ४) कार्यालयीन प्रक्रिया -

  1. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
  2. सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.
  3. शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
  4. सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
  5. अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे.
  6. जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामांसाठी हे टोकन दाखवले तरी चालते.
  7. टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवुन आपला जातीचा दाखला घ्यावा व सर्व माहिती अचुक आहे का ते तपासुन पहावे.
जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
=======================

******** सुचना ********
सुचना क्रं. १ - जर १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वी जन्म झालेल्या तुमच्या वडिलांचा जातीचा पुरावा उपलब्ध असेल तर वडिलांशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी.
सुचना क्रं. २ - वडीलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नाते संबंधितांचे पुरावे द्यावे लागत असल्यास तुमचे आणि त्या संबंधित व्यक्तीचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी आणि त्याबद्दल काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते ही द्यावेत.

वंशावळ कशी लिहावी ?

मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नाते संबंधातील व्यक्तीशी तुमचे नाते दर्शवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वंशावळीचे उदाहरण..
                                                                    आजोबा
                                                                          |
                                                             """""""""""""""""
                                                            |             |            |
                                                      वडील       चुलते        आत्या
                                                          |
                                                 """""""""""
                                                |         |        |
                                           तुम्ही    भाऊ   बहीण
सुचना क्रं.३ - महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०१ सप्टेंबर २०१२ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ३ अन्वये अर्जदार इतर तालुक्यातुन/पर जिल्हातुन/परराज्यातुन स्थलांतरित किंवा महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थलांतरित झाला असल्यास,अर्जदार ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्याचे वाडवडिल किंवा नातेवाईक राहत होते,त्या संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज करील.
सुचना क्रं.४ - १३ ऑक्टोबर १९६७ च्या पुराव्यासाठी ज्या व्यक्तीचा जातीचा पुरावा देणार आहात त्या व्यक्तीचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण ज्या तालुक्यात/ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येते त्याकडेच तुम्हाला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल.

सुचना क्रं. ५ - विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे

अ)विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा कोणताही एक पुरावा
ब)विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
क)राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला
=======================
प्रत्येकाने ही माहीती शेअर करा.
=======================
सौजन्य - www.asskoperators.blogspot.com
=======================

SHARE THIS

0 टिप्पणी(ण्या):