Admissions to Industrial Training Institutes Apply Online Start 27 June 2013 (11-00 AM)

Admissions to Industrial Training Institutes Apply Online Start 27 June 2013 (11-00 AM)

Welcome to ITI Admission Section. Here you will find ITI Admission 2013-14 Date, Eligibility Criteria and Selection Process and Application Form of Industrial Training Institutes...
&
How to apply ITI admission?


!!जय महाराष्ट्र!!
A list of sites on the state of maharashtra agriculture ( महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी )

A list of sites on the state of maharashtra agriculture ( महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी )

आधुनिक कृषितंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करणारी एकच यंत्रणा असावी यादृष्टिने कृषि विभागाची रचना करण्यांत आलेली आहे. सुलभ संपर्कासाठी प्रत्येकी तीन ते चार खेडयांसाठी एक कृषि सहायकाचे पद देण्यांत आलेले आहे. या कृषि सहायकाचे कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकरी कुटुंबाची सरासरी संख्या ८०० ते ९०० पर्यत असल्यामुळे कृषि तंत्रज्ञान थेट शेतक-यांपर्यत पोचविणे सुलभ झाले आहे.


विषयक सर्व योजना राबवल्या जातात. यावर मंडलस्तरावर मंडल कृषि अधिकारी यांचे नियंत्रण असते. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषि अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व संभागस्तरावर विभागीय कृषि सह संचालक यांची कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेकडे कृषि विकास अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय नियंत्रणाखाली पंचायत समितीस्तरावर कृषि अधिकारी हे निरनिराळया कृषि निविष्ठाविषयक योजना राबवतात.

क्षेत्रीय स्तरावर राबवल्या जाणा-या सर्व योजनांच्या तांत्रिक व प्रशासकीय संनियंत्रणासाठी राज्यस्तरावर कृषि आयुक्तालयात मृदसंधारण, फलोत्पादन, विस्तार, निविष्ठा व गुणनियंत्रण , सांख्यिकी, संनियंत्रण व मुल्यमापन, नियोजन व अंदाज हे विभाग कार्यरत आहेत, तर आस्थापना व लेखाविषयक बाबींची हाताळणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत.

Agricultural Education and Research Institute(कृषी शिक्षण व संशोधन संस्था )

१. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
५. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

ऑनलाईन बाजार भाव:

१. कृषी पणन मंडळ
२. आजचा बाजारभाव
३. शेती माल माहिती
४. शेती देवाणघेवाण 

कृषी आकडेवारी:

१. कृषी गणना
२. पर्जन्यमान
३. पिक पेरणी
४. पिक सांख्यिकी

महत्त्वपूर्ण कृषी व्यावसायिक संस्था आणि योजना:

११. महाराष्ट्र शासन
१२. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
१३. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर
१४. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती
१५. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, महाराष्ट्र राज्य
१६. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
१७. छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ
१८. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित

जर काही दुवे चुकेचे असतील अथवा काम करत नसतील तर कळविणे. अजून काही दुवे तुमच्याकडे असतील तर कळविणे.

!!जय महाराष्ट्र!!
Maharashtra Garmpanchayat :- Pattern (महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप)

Maharashtra Garmpanchayat :- Pattern (महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप)

Maharashtra Garmpanchayat : Pattern (महाराष्ट्र ग्रामपंचायत : स्वरूप)

ग्रामपंचायत हा पंचायती राज चळवळीतील सर्वात महत्वाचा आणि मुलभूत घटक आहे. पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद ह्यांच्या यशस्वी कारभारासाठी सक्षम आणि सुदृढ ग्रामपंचायत हि पहिली पायरी आहे किंबहुना त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देशच आहे.

ग्रामपंचायतीचे स्वरूप:

ग्रामपंचायत म्हणून मान्यतेसाठी पठारी भागात किमान ५०० लोकसंख्या हवी तर डोंगरी भागात ३०० ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या लोकसंखेनुसार ७-१७ पैकी कितीही असू शकते.
लोकसंख्या सदस्यसंख्या
५००-१५०० ०७
१५०१-३००० ०९
३००१-४५०० ११
४५०१-६००० १३
६००१-७५०० १५
७५०१ हून अधिक १७
  • ग्रामपंचायत सदस्यांची निवड हि सार्वत्रिक गुप्त मतदान पद्धतीने होते.
  • ग्रामपंचायतीचा कालावधी हा ५ वर्षांचा असून अविश्वास ठरवणे
  • ग्रामपंचायत बरखास्त करता येते.
  • ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यापूर्वी मतदार यादी आणि प्रभाग रचना निश्चिती प्रसिद्ध केली जाते.
  • एका प्रभागातून २/३ सदस्य निवडून येतात.
  • निवडणुकी नंतर जिल्हाधिकारी निवडलेल्या सदस्यांची नवे जाहीर करतात.

ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीसाठी अर्जदाराची अर्हता:

  1. गावाचा रहिवासी असावा.
  2. गावाच्या मतदार यादीत नाव असावे.
  3. अर्जदाराचे वय २१ पूर्ण असावे.
  4. आर्थिक दिवाळखोर नसावा.
  5. वेडपट नसावा.
  6. अस्पृश्यता कायद्याखाली दोषी नसावा.
  7. सरकारी कर्मचारी नसावा.
  8. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.
  9. रु. ५०० अनामत रक्कम भरावी लागेल.
  10. अर्जदारासाठी कसलीही शैक्षणिक पात्रता लागू नाही.
आणि अति महत्त्वाचा नियम म्हणजे “भारताचा(च) नागरिक असावा”

मतपत्रिकांचा रंग:

पांढरा               –  सर्वसाधारण
फिकट पिवळा  –  मागासवर्गीय
फिकट हिरवा   –  अनुसूचित जमाती
फिकट गुलाबी  –  अनुसूचित जाती-जमाती

!!जय महाराष्ट्र!!
Functions of Gram Panchayat in Maharashtra (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचे कार्ये)

Functions of Gram Panchayat in Maharashtra (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचे कार्ये)

Functions of Gram Panchayat in Maharashtra (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कार्ये)

ग्रामपंचायत म्हणजे एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा. ग्रामपंचायत कामकाजाचे ८ विभाग व २३ विषय खालीलप्रमाणे असतात...

ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :

  1. भूविकास
  2. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
  3. जमिनीचे एकत्रीकरण
  4. मृदुसंधारण
  5. लघु पाट बंधारे
  6. सामाजिक वनीकरण
  7. घर बांधणी
  8. खादी ग्रामोद्योग
  9. कुटिरोद्योग
  10. रस्ते, नाले, पूल
  11. पिण्याचे पाणी
  12. दळण वळणाची इतर साधने
  13. ग्रामीण विद्युतीकरण
  14. अपारंपरिक उर्जा साधने
  15. दारिद्रय निर्मुलन
  16. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
  17. बाजार आणि जत्रा
  18. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
  19. महिला आणि बालविकास
  20. प्रौढ शिक्षण
  21. सांस्कृतिक कार्यक्रम
  22. सार्वजनिक वितरण
  23. उत्पादनाच्या बाबी

ग्रामपंचायतींची कार्ये:

  1. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
  2. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
  3. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
  4. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
  5. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
  6. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
  7. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
  8. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे

!!जय महाराष्ट्र!!